Ad will apear here
Next
श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले
श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन डॉ. अतुल भोसले यांनी मंदिर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.पंढरपूर : येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार डॉ. अतुल भोसले यांनी नुकताच स्वीकारला. या वेळी त्यांनी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांकडून कामकाजाची माहिती घेतली. तसेच देवस्थानतर्फे उभारण्यात येत असलेल्या भक्त निवासाच्या कामाची पाहणी करून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या भक्त निवासाची पाहणी करताना नूतन अध्यक्ष डॉ. अतुल भोसले.महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची निवड झाल्याचे राजपत्राद्वारे सांगण्यात आले होते. राज्य सरकारने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच तीन जुलै रोजी राजपत्र प्रसारित केले होते. एकादशीच्या मुहूर्तावर डॉ. अतुल भोसले यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पंढरपूरचे प्रांतधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी नतून अध्यक्षांचे स्वागत केले. या वेळी देवस्थान समितीचे सदस्य संभाजी शिंदे, व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार विलास महाजन, लेखाधिकारी रवींद्र वाळुंजकर, कृष्णा कारखान्याचे संचालक जगदीश जगताप, कृष्णा कामगार सोसायटीचे चेअरमन पैलवान आनंदराव मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

यानंतर देवस्थान समितीच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या भक्त निवासाच्या कामाची पाहणी डॉ. अतुल भोसले यांनी केली. दरम्यान, त्यांच्या अध्यक्षतेखाली २१ जुलै रोजी नूतन समिती सदस्यांची पहिलीच बैठक होणार आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZFHBE
Similar Posts
पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडाचे दोन हजार कोटी पंढरपूर : ‘शहराच्या विकासासाठी कॅनडा सरकारने आर्थिक साह्य करण्याची घोषणा केली आहे. कॅनडा सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे,’ अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली. भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परदेशी शहराच्या धर्तीवर
बार्शी पोलीस ठाण्याचे उद्घाटन सोलापूर : ‘बार्शी तालुका पोलीस ठाण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा मिळेल,’ असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी बार्शी येथे व्यक्त केला.
वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी शेड्सची उभारणी पुणे : ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या असून, लाखो वारकऱ्यांचा मेळा आळंदी आणि देहूतून पंढरीच्या वाटेवर चालत आहे. या वारकऱ्यांना वारीदरम्यान उन्हा-पावसात निवारा मिळावा म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे वारी मार्गावर तीन कायमस्वरूपी शेड्स उभारण्यात
‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’तर्फे वारकऱ्यांसाठी विविध सुविधा मुंबई : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एफआयएल) आणि कंपनीची सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन (एमएमएफ) पंढरपूरच्या वारकऱ्यांना वारीदरम्यान सुविधा उपलब्ध करून दिल्या. यात वारकऱ्यांना त्यांच्या चीजवस्तू ठेवण्यासाठी टिकाऊ पिशव्या, वैद्यकीय शिबिरे आणि रात्रीच्या विश्रांतीसाठी तीन थांब्यांचे बांधकाम यांचा समावेश आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language